
घरातून 90 लाख लांबवणाऱ्याला अटकज्या घरचं मीठ खाल्लं त्यांनाच लुबाडलं,
मिळालेल्या माहितीनुसार, जितेन मिस्त्री हे व्यावसायिक दादर येथे राहतात. 12 ऑक्टोबर रोजी त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत घरातील नोकराने पैसे चोरल्याची फिर्याद दिली. दुसऱ्या दिवशी पहाटे एकच्या सुमारास आरोपी वीरेंद्र याला अटक करण्यात आली.12 ऑक्टोबर रोजी मिस्त्री यांनी वीरेंद्रला चोरी करतना रंगेहात पकडले. त्यांनी त्याला जाब विचारला असता वीरेंद्र यानेच मोठ्या आवाजात आरडाओरडा करायला सुरूवात केली आणि तो गडबडीने घरातून पळून गेला. त्यानंतर मिस्त्री यांनी त्यांच्या आईचे कपाट तपासले असता, सुमारे 50 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 40 लाखांची सोन्याची बिस्कीटे असा एकूण 90 लाखांचा माल घेऊन (नोकर) वीरेंद्र पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे समजल्यावर ते हादरलेच. त्यांनी दादर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत आरोपी वीरेंद्र याला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. चोरीचा माल कुठे लपवला, याचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.


