
काटोलात तरुणाची गळा चिरून हत्या.p
काटोल शहरातील फल्ली मार्केट येथे आज
मंगळवारी 7 फरवरी ला 12 वाजता सुमारास धारदार शस्त्रराणे तरुणाची हत्या करण्यात आली. अशोक सावरकर 28 रा. शनी चौक काटोल असे मृत तर शैलेश लाड राहणार खंते लेआउट काटोल असे फरार आरोपीचे नाव आहे. दोघाची आपसात तोंड ओळख होती ते मंगळवारी दुपारी काटोल शहरातील फल्ली मार्केट दारू पिण्यासाठी गेले होते. दारू पिण्याच्या वादावरून दोघांमध्ये वाद उद्भवला आणि भांडणाला सुरुवात झाली त्यात काहीच क्षणातच शैलेशने चाकू काढून आकाश च्या गळ्यावर दाबला त्यात त्याच्या गळा चिरल्याने तो गंभीर जखमी झाला. तो खाली कोसळताच शैलेशने घटनास्थळ वरून पळ काढला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. आकाश ला जखमी अवस्थेत शहरातील ग्रामीण रुग्णालयातील तिथे प्रथम उपचार केल्यानंतर त्याला नागपूर हलविण्यात आले. मात्र त्याचा वाटतच मृत्यू झाला. या प्रकरणी काटोल पोलिसांनी भा द वि. 302 अव न्ये गुन्हा नोंदवून आरोपी शैलेशचा शोध सुरू आहे.



