सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण आमदार सुनील केदार यांना भोवले (एक वर्षाची सजा )

सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण आमदार सुनील केदार यांना भोवले

 नागपूर १३ जानेवारी – आमदार सुनील केदार यांनी सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने 353 च्या गुन्हयात 1 वर्षांची  शिक्षा व दोन हजार रुपयाचा दंड सुनावला आहे.

काय आहे प्रकरण सविस्तर वृत्त

6 ऑक्टोबर 2016 रोजी कोराडी-तिडंगीदरम्यान अतिउच्चदाब वीजवाहिनी टाकण्याचे काम महापारेषणच्या वतीने सुरू होते. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीही अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी महापारेषणचे सहाय्यक अभियंता अमोल खुबाळकर हे 6 ऑक्टोबर 2016 रोजी दोन-तीन अधिकाऱ्यांसह तेलगाव येथे शेतकऱ्यांशी त्यांच्या पिकहानीच्या भरपाईसंबंधी वाटाघाटी करण्यासाठी गेले होते. सोबत येथील कंत्राटदार मेसर्स बजाज कंपनीचा एक अधिकारीही होता. अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच आमदार सुनील केदार सहकाऱ्यांसह ठिकाणी पोहोचले.महापारेषणला येथे काम सुरू करण्याची परवानगी दिली कुणी, हा प्रश्न विचारून त्यांच्यासह इतर चौघांनी थुबाळकर व कंत्राटदाराच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करून अचानक मारहाण सुरू केली. पुन्हा या भागात काम करताना दिसल्यास तुमचे तुकडे करून घरी पाठवू, अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप सुनील केदार यांच्यावर होता. याची तक्रार केळवद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या प्रकरणात आज नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनील केदार यांना दोषी धरत शिक्षा सुनावली. काँग्रेस आमदार सुनील केदार यांना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने 353 च्या गुन्हयात 1 वर्षांची  शिक्षा व दोन हजार रुपयाचा दंड सुनावला आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close