महिलेवर वारंवार अत्याचार

नाशिक, 3 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. नाशिक जिल्ह्यातही गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यातच अंगात दैवी शक्ती आल्याचे भासवून भोंदूबाबाने एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकच्या उपनगर भागात हा संतापजनक समोर आला आहे. याप्रकरणी भोंदू बाबासह आणखी तिघांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विष्णू काशिनाथ वारुंगसे उर्फ देवबाबा असे आरोपीचे नाव आहे. त्याने एका महिलेवर त्याच्या राहत्या घरी आणि इतर ठिकाणी वारंवार महिलेच्या संमतीविना शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तर याबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आरोपीने महिलेच्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवले होते. तसेच घर घेऊन देण्याचे आमिष दाखून महिलेकडून सुमारे 5 लाख रुपये घेऊन तिची फसवणूक केली, असे पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close