जीव वाचवनाऱ्यालाच बनवले गुन्हेगार.

 

जीव वाचवनाऱ्यालाच बनवले गुन्हेगार.

—– जलालखेडा येथील घटना.

जलालखेडा (ता.16) जलालखेडा येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एक युवक जखमी जखमी झाला असून ही घटना शुक्रवार (त.12) जलाल खेडा बस स्थानक परिसरात घडली. दोघांचे भांडण होत असताना आजू बाजूचे नागरिकानी बघ्याची भूमिका घेतली असता. बाजूला उभे असलेले दादू नाडेकर व नितीन निमसरे या दोघांनी जाऊन भांडण सोडवला. असे असताना नितीन निमसडे यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राजकीय दबावातून हा गुन्हा दाखल केला असल्याचे बोलले जात आहे. जीव वाचवनाऱ्यावर जर गुन्हा दाखल केला जात असेल तर भविष्यात कोणीही कोणाच्या मदतीला जाणार नाही हे यातून सिद्ध होते. ज्याने हे भांडण सोडवले आणि जखमी तरुणांचा जीव वाचवला त्याला जीव वाचवण्याची पावती म्हणून तुरुंगात पाठवण्यात आले. ही घटना जलालखेडा येथील बसस्थानक परिसरात शुक्रवारी (दि. १२) रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. यातील आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जीव वाचवनाऱ्या नितीन ला राजकीय हस्तक्षेप केल्याने फसविल्या गेले असे सर्वत्र चर्चा आहे,त्यावेळी पोलीस प्रशासनावर दबाव आणला होता अशीही चर्चा आहे,या वादाचा विडिओ व्हायरल होत असून नितीन ची कोणतीही चूक नाही त्यात तो जखमींचा जीवच वाचवत होता हे स्पष्ट दिसत आहे..

बंटी यांच्यात शनिवारी रात्री किरकोळ कारणावरून भांडण झाले. याच भांडणात बंटीने फरीदवर कुन्हाडीने डोक्यावर पाच वार केल्याने तो गंभीर जखमी झाला अशी तक्रार करण्यात आली. नागरिकांनी त्याला लगेच जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले तिथे प्रथमोपचार करून त्याला रेफेर करण्यात आले,
याप्रकरणी जलालखेडा पोलिसांनी भादंवि २९४,३०७,५०६,३४ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी बंटी सोलंकी व नितीन निमसडे यास अटक केली. त्याला शनिवारी (दि. १३) नरखेड येथील न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती, त्याना पुन्हा सोमवारी न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आले, व तेथून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.

फरीद मजीद शाह बानवा असे जखमी तरुणाचे तर बंटी अज्जूसिंग सोळंकी (१८) नितीन निमसरे(३५)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
खोट्या गुन्ह्यात गोवल्या गेलेल्या जीव वाचवनाऱ्या नितीन ला न्याय मिळावा अशी नागरिकांची मागणी आहे यासाठी ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची लवकरच भेट घेणार असून घडलेल्या घटनेची चर्चा करणार असून ठाणेदार यांची तक्रार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close