नागपुरात आत्महत्येचा बनाव, 16 वर्षीय मुलीची हत्या,

नागपुरात आत्महत्येचा बनाव, 16 वर्षीय मुलीची हत्या,  

आरोपी हा विकृत स्वभावाचा आहे. त्याने आपल्या स्वार्थासाठी मुलीचा जीव घेतला.

नागपूर – आपल्या स्वार्थासाठी बापाने मुलीची हत्या केल्याची घटना कळमना पोलीस स्टेशन हद्दीत  घडली . आरोपी पित्याला पहिल्या पत्नीपासून तीन मुलं आहेत. त्यात सोळा वर्षाची मुलगी ही मोठी आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर त्यानं दुसर लग्न केलं. मात्र पत्नीसोबत न राहता वडिलांच्या घरीच जास्त राहत होती. तिला आणि तिच्या परिवाराला धडा शिकविण्यासाठी त्याने मुलीचा सहारा घेतला. मुलीला आत्महत्या करण्याचा बनाव करायला सांगितलं. त्यासाठी त्याने छताला दोर बांधलं. गळफास मुलीच्या गळ्यात टाकला आणि फोटो काढले. फोटो काढतानाच त्याने खाली ठेवलेले स्टूल हाताने आणि पायाने सरकवला. मुलीचा फास लागून जीव गेला.मात्र त्याने मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव करून पोलिसात तक्रारसुद्धा दिली. मात्र पोलिसांना यात संशय आला. त्यांनी तपास केला असता पित्यानेच मुलीची हत्या केल्याचं उघड झालं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close