
नरखेड तालुक्यात बेलोना येथे साक्षीदाराची गोळ्या झाडून हत्या
- मिल्ट्री जवान भारत कळ्बे यांनी केलेल्या खुनात मोवाड चे निलेश जाधव , जगधीश कठाणे हे साथीदार होते त्यांच्या मदतीने पहेलवान चा गेम केला . त्यांच्या विरुद्ध ३०२ ,३४ भाद्वी तर आर्म कायदा २५,३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव यांच्या देखरेखित मोठ्या पोलीस बदोबस्तात अंतसंस्कार करण्यात आला
बेलोना प्रतिनिधी चंद्रशेखर मस्के – बेलोना ते माणिकवाडा रोड लगत असलेल्या झोपड्यात अल्पवयीन मुलीवरील बलात्कार
केलेल्या प्रकरणातीलआरोपीला वाचवण्यासाठी आरोपीच्या कुटूबियानी साक्षीदाराला धमकी दिली होती. मात्र साक्षीदाराने साक्ष फिरवण्यास नकार दिल्याने आरोपीच्या भावाने साक्षीदाराची गोळ्या झाडून १२ सप्टेबर रात्री ८ वाजताच्या सुमारास बेलोना येथून काहीच अंतरावर हत्या केल्याची
खळबळजनक घटना नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील बेलोना या गावात घडली आहे. केशव मस्के असे हत्या झालेल्या इसमाचे नाव असून ते माजी कुस्तीपटू होते. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी भरत कळंबे याला अटक केली असून दोन संशयित व्य्क्तीना ताब्यात घेतले आहे हत्येच्या या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे तीन वर्षांपूर्वी आरोपीचा भाऊ प्रेमराज कळंबेने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. त्या प्रकरणाचा केशव मस्के साक्षीदार असल्याने साक्ष बदलण्यासाठी आरोपी आणि त्याच्या भावाकडून वारंवार दबाव टाकला जात होता. मात्र, केशव मस्के साक्ष बदलण्यास तयार नसल्याने आरोपीने हत्या केल्याचे समोर आले आहे. माझ्या भावाविरोधातील बलात्काराच्या प्रकरणात बलात्कार पीडीतेचे कुटुंब आणि इतर साक्षीदारांना न्यायालयीन कामकाजात मदत का करतो ? हा देखील राग आरोपीच्या भावाने व्यक्त करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.पीडितेच्या कुटूंबाला मदत केली म्हणून हत्या – आरोपीचा भाऊ काही वर्षांपूर्वी बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगात आहे. केशवराव मस्के त्या प्रकरणात बलात्कार पीडित आणि तिच्या आईला मदत करत होते. तोच राग मनात धरून आरोपी भरत कळंबेने काल रात्री, बेलोना गावात रस्त्यावरून केशवराव मस्के जात असताना त्यांची गोळी झाडून त्यांची हत्या केली. दरम्यान, हत्येच्या या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून गावकरी नरखेड पोलीस स्टेशनसमोर गोळा झाले आहे. पोलिसांनी नरखेड पोलीस स्टेशनच्या समोर आणि गावात बंदोबस्त लावला आहेभरत कळंबेने काल रात्री, बेलोना गावात रस्त्यावरून केशवराव मस्के जात असताना त्यांची गोळी झाडून त्यांची हत्या केली. दरम्यान, हत्येच्या या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून गावकरी नरखेड पोलीस स्टेशनसमोर गोळा झाले आहे. पोलिसांनी नरखेड पोलीस स्टेशनच्या समोर आणि गावात बंदोबस्त लावला आहे भरत याने 3 जणांच्या मदतीने केशवराव यांना साक्ष फिरवण्यास सांगितलं पण ते ऐकत नसल्याचं पाहून राग अनावर झालेल्या भरतने त्यांच्या डोक्यात गोळी झाडली.दरम्यान भरत याच्या विरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. भरत दुचाकी वरून पळून जात असल्याचं समजताच त्यांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली अखेर मोवाडवरून जलालखेडाकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी भरतला सापळा रचून अटक केली
Live Cricket
Live Share Market



