
काटोल येथे रक्त संकलन केंद्राचा शुभारंभ/इतर बातम्या
लाईफ लाईन ब्लड बँकेचा उपक्रम
काटोल -लाईफ लाईन ब्लड बँक, नागपूरचे रक्त संकलन केंद्र डॉ. करांगळे हॉस्पिटल काटोल येथे नुकतेच सुरू करण्यात आले आहे.रक्त संकलन केंद्राचे उदघाटनडॉ. गोविंद भुतडा तर प्रमुख अतिथी म्हणून बालरोगतज्ज्ञ डॉ.अमोल करांगळे, डाॅ.वर्भे, डॉ. बी. एन. भुतडा, डाॅ. अग्रवाल, डॉ.नाकाडे, डाॅ.नरेश राठी, डाॅ.सचिन चिंचे, डाॅ.सचिन घाटे, डाॅ. रेवतकर, डाॅ. दिनेश डवरे, डाॅ. करांडे, डाॅ. समीर मोहीते, डाॅ.पराग नांदगावकर, डाॅ. वानखेडे, डाॅ. पोहकार उपस्थित होते.नागपूर येथे करण्यात येणार्या अनेक शस्त्रक्रिया काटोल मध्ये होत आहे, पण या शस्त्रक्रिया करतेवेळी
लागणारे रक्त उपलब्ध होत नव्हते.परंतु आता डॉक्टर करांगळे त्यांच्याकडे रक्त संकलन केंद्र सुरू झाल्याने रुग्णांना काटोल मध्येच सहज रक्त उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे काटोल हे मोठ्या प्रमाणात रक्तदान करणारे शहर म्हणून ओळखले जाते व येथील रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास नागपुरला जावे लागत असे. त्यामुळे या रक्तसंकलन केंद्रामुळे काटोल आणि सभोवतालच्या परिसरातील रुग्णांना करांगळे हॉस्पिटल येथे सहज रक्त उपलब्ध होणार आहे.यावेळी लाईफ लाईन ब्लड बँक नागपूरचे डॉ. हरीष वर्भे यांनी परिचारिकेची कार्यशाळा (CME)घेत, रुग्णांना रक्त देते वेळी घ्यायची काळजी यासंबंधी मार्गदर्शन केले.यावेळी ३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरितामहेश दळवी, संदीप बेले, किशोर धवड, श्रीकांत देवळे, चंद्रकांत ठाकरे, सचिन वैद्य, गिरीश उईके, दिपेश वरोकर, अमित खराडे, सारंग सावल, विजय महाजन, शरद डंभाळे आदींनी सहकार्य केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये
अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
यांच्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी रोहित पवारांचं तोंडभरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. ‘आज अहिल्यादेवी होळकरांचे स्मरण करताना इथे उद्योग आणण्यासाठी रोहित प्रयत्न करतोय. पुढील काळात मोठा रोजगार येईल. रस्ते असो, पाणी असो, रोजगार असतो, अहिल्यादेवी होळकरांनी जे केलं ते तुमचा आमदार करतोय’ अशा शब्दात पवार यांनी नातू रोहित पवारांचं कौतुक केलं.
शरद पवार म्हणाले की, ‘उभ्या आयुष्यात जे कर्तृत्व अहिल्यादेवी होळकरांनी दाखवलं ते आजत्या कार्यक्रमातून पुढे जात आहे. देशात तीन महिलांची नावं घेतली जातात. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर. सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. प्रशासन कसे चालवावे हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी सर्व जाती-धर्मासाठी काम केले. जिजामाता, सावित्रीबाई आणि अहिल्यादेवी या सर्वांचे काम वेगवेगळे होते. आजचा दिवस स्त्रियांचा सन्मान करण्याचा आहे’.
मान्सूनसंदर्भातली आनंदाची बातमी
मुंबई : मान्सूनसंदर्भातली आनंदाची बातमी..अरबी समुद्रात गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून अखेर केरळात दाखल झाला. यंदा वेळेआधीच मान्सून केरळात दाखल झाला असल्याची माहिती हवामान खात्याने दिलीय. तर मान्सूनचा पुढचा प्रवासही वेळेत होणार आहे आणि मान्सून 6 जून ते 10 जून या काळात महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.



