
चिखली माळोदे येथील इसमाचा खूण की विष देऊन घातपात ?
डोगरगाव शिवारात चिखली माळोदे येथील इसमाचा खूण की आत्महत्या? या घटने वर काटोल तालूक्यात चर्चेला .ऊत !
काटोल तालुक्यातील चिखली माळोदे येथील सुरेश पुंडलिक कोठाडे ५० याचा मृतदेह डोगरगाव शिवारात गुरुवारी तीन मार्च रोजी आढळून आला. मृतकाचा घातपात झाली की आत्महत्या याचा शोध काटोल पोलीस करीत आहे.
सविस्तर वृत्त असे की सुरेश पुडलिक कोठडे चिखली माळोदे येथील रहवासी आहे. यांचे राहत्या गावा पासुन घटना स्थळ 20 किमी अंतरावर आहे. सुरेश कोठडे यांच्या मृतदेह कबीर आश्रम पासुन १५० मीटर अंतरावर एका शेतात पडून होता. हा परिसर झुडपी जंगलात येतो त्या परिसरात सुरेश गेला कसा? मृतकाच्या बाजूला विषारी औषध पडून होती त्यामुळे सुरेशनी आत्महत्या केली असावी का? असा प्रश्न उपस्तित होतो. घटनेच्या पुर्वी सुरेश नी आपल्या परिवारातील सदस्य यांना येनवा येथील व्यक्तीला 45000 हजार रुपये उसने दिले होते. ते उसनवारीचे पैसे मागण्या करिता जातो अशी माहिती दिली होती. दोन मार्च च्या संध्याकाळी तो घुगर मेट येथे आपल्या मित्राची वाट बघत बसला होता. अंधार झालेला आहे. पैसे नंतर घेऊन जा असे येनवा च्या मित्राने सांगितले. तेव्हा तो आपल्या घरा कडे परतला असता . घुगऱमेट ते कबीर आश्रम च्या दरम्यान सुरेश सोबत काय? घडले तो वाहत्या रस्त्या पासुन एका शेतात गेला तेथे विष घेतले हा प्रकार बनवा बनवीचा आहे. त्याचा घातपात झाला असावा अशी शंका निर्माण होते.
सदर ही घटना काटोल पोलीस स्टेशन च्या हद्दीत असून काटोल तालुक्यातील डोगरगाव शिवारात तीन मार्च २०२२ रोजी घटली. काटोल पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी करिता काटोल च्या ग्रामीण रुग्णालयात नेले. कारवाई नंतर परीवाला मृतदेह सोपविण्यात आले मृतक सुरेश कोठाडे चा पुतण्या राकेश राणा कोठाडे यांनी काटोल पोलीस स्टेशन ला तक्रार दिली आहे. त्या तक्रारीत माझे काका याच्या मृत्यू वर शंका आहे यांच्या मृत्यूचा तपास काटोल पोलिसांनी करावा असे नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास काटोल पोलीस करीत आहे. परंतु या प्रकरणातील सत्यता काय आहे हे पोलिसांना आव्हान आहे.



