रशियाचा युक्रेनवर हल्ला ! जाधव यांच्या घरावर आयकर

 

नवी दिल्ली : रशियाचा  युक्रेनवर हल्ला सुरु 

काळातील सायरनचे आवाज धडकी भरवत आहेत. टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून भारतातील घराघरात हे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनच्या आकाशात धूर आणि धुराचे लोट पाहून ज्या भारतीय कुटुंबांची मुले-मुली तिथे अडकली आहेत, ती घाबरली आहेत. युक्रेनमध्ये अजूनही १८,००० हून अधिक भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेनमधून भारतीयांना एअरलिफ्ट करण्यासाठी ७२ तासांपूर्वी ऑपरेशन सुरू केले. पण हल्ला सुरू झाल्यानंतर ते थांबवावे लागले आहे. युक्रेनला निघालेले एअर इंडियाचे विमान दिल्लीला परतत असल्याची बातमी आज सकाळी आली.

मुंबई:यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभाग चा छापा त्यामुळे शिवसेना मध्ये खळबळ :: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर आता केंद्रीय तपास यंत्रणांनी आपला मोर्चा शिवसेनेकडे वळवला आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरावर धाड टाकली आहे. इन्कम टॅक्स अधिकारी सीआरपीएफ जवानांसह सकाळीच यशवंत जाधव यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी घरातच यशवंत जाधव यांची चौकशी सुरु केल्याचे समजते. सध्या त्यांच्या घरात कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. परंतु, यशवंत जाधव यांची नेमकी कोणत्या प्रकरणात चौकशी सुरू आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. यशवंत जाधव हे गेल्या पाच वर्षांपासून पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून सातत्याने केला जातो. त्यामुळे आता संजय राऊत यांच्यानंतर शिवसेनेचा आणखी एका नेता केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातो. विशेष म्हणजे नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ मंत्रालयाशेजारी महाविकासआघाडीचे जे धरणे आंदोलन झाले होते त्यामध्ये यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव सहभागी झाल्या होत्या. त्याच्याच दुसऱ्या दिवशी यशवंत जाधव यांच्या घरी धाड पडल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

काटोलात संत गाडगे बाबा जयंती

काटोल शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसरात संत गाडगे बाबा मंच च्या वतीने गाडगे बाबा जयंती साजरी करण्यात आली.

मोटार पम्प, केबल चोरटा अटकेत 

काटोल पोलिसांनी केला यांच्या शेतातील ४८ हजाराचा माल चोरून नेला. यांची माहिती काटोल पोलिसांना मिळताच घरतवाडा येथून अटक केली

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close