भोरगड ते पांढरढाकणी रोडचे डांबरीकरण करा

सरपंच प्रदिप मसराम यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन

भोरगड पांढरढाकणी गावच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी व  डांबरीकरण करण्याची मागणी सरपंच प्रदीप मसराम यांनी केली आहे. पांढरढाकणी अंतर्गत असलेल्या पाचही गावचे नागरिक याच रस्त्याने दळण वळण करतात.नागरिकांसाठी दुसरा रस्ताच नसल्याने त्यांनाही याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. मालवाहतूकही येथूनच होते. या सर्व कारणांमुळे आणि रस्त्यावरील रहदारीमुळे रस्ता सुस्थितीत असणे गरजेचे आहे. मात्र, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.हा रस्ता अनेक ठिकाणी दुतर्फा बाजूने खचला असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची खडी निघून गेली आहे.रात्री-बेरात्री येथून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या रस्त्याचा वापर करणारे तीन गावांतील नागरिक आता सरकारी दिरंगाईला वैतागले आहेत.जि.प. सदस्य श्री चंद्रशेखरजी कोल्हे व डॉ. अनिलजी ठाकरेसरपंच प्रदिप मसराम यांनी संबंधित विभागाला निवेदन देऊन रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे.

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close