
गोडेगाव येथे अवैध दारू अड्यावर एकला केले जागेवरच ठार तर दोघांना गंभीर मारहाण
अवैध दारू अड्यावर एकला केले जागेवरच ठार तर दोघांना गंभीर मारहाण
तीन पोलिसांच्या ताब्यत तर बाकीच्याचा तपास आहे सुरू
बेलोना प्रतिनिधी: चंद्रशेखर मस्के
नरखेड तहसील मधील गोडेगाव येथील अवैध दारू अड्यावर एकाचा खून तर दोघेना जबर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. . नरखेड तालूक्यात सध्या अवैध दारू विक्री सरेआम सुरु आहे याचा भुदण्ड एकला जीव देऊन गमवावा लागला. सविस्तर बातमी अशी बेलोना येथून रोशन शेषराव बनाईत वय 30,माधव गणपती अलोने वय 35,हमेश

बनाफर वय 26 तिघे गोडेगाव येथे बनावट दारूचा अवैध अड्यावर दारू पिण्यासाठी गेले असता यांना दारू हड्यावर जबरन मारहाण केली.त्यात
रोशन शेषराव बनाईत याचा पण हात तोडून जागीच जीव घेतला . तसेच माधव गणपती अलोन याला लाकडाच्या दांड्याने मारहाण केली असता रक्तनी लहू लुहान करून त्याचा हात तोडला त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढून त्याला जंगली एरियात जाऊन लपावे लागले तसेच हमेश याला डोक्यावर लाकडी दंड्याने वार करून त्याला बेशुद्ध केले आणि रोशन याच्यावर जबरण मारहाण केली. त्यात त्याचा जीव गेला असता हमेश आणि रोशनला मोटार सायकल वरती आणून मानिकवाडा ते बेलोना इंडियन गॅस गोडवून च्या जवळ आणून टाकून दिले .
माधव अलोन आपली जीव वाचवण्यासाठी लपून बसले असता त्यांनी गावातील त्याच्या घराजवळ असलेल्या मित्राला फोन करून सर्व माहिती सांगितली असता बेलोना येथून प्रचंड प्रमाणात गावकरी जनतेनी धाव घेतली असता. माधवला वाचवण्यात यश आले असून दुसरीकडे रोशन मृत मिळाला असून त्याच्या सोबत हमेश पण मिळाला तिघांना वेग वेगळ्या ठिकाणावरून वूचलून नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता रोशनला डॉक्टरनी मृत घोषित केले तर माधव अलोने याला तत्काळ नागपूर मेडिकल हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे तर हमेश याच्यावरती नरखेड ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयात मृत आणि गंभीर व्यक्तींच्या रीलेटेट आणि मित्र मंडळींचा आक्रोश पाहता तिथे कडक पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आला आहे.नरखेड पोलीस स्टेशनमधील पी. यस आय जयपाल सिंग गिरासे आणि त्याच्ये सहकारी पोलीस यांनी खुनाची तपासणी सुरू केली असता तीन आरोपींना पकडण्यात त्यांना यश आले असून बाकीचा तपास चालू आहेत तसेच मारपीट करण्या मागचे नेमके काय कारण आहेत यांचा तपास सुरू आहेत .या घटनेमुळे परिसरात खूब मोठी हाहाकार पसरली असून संपूर्ण बेलोना गावातील जनतेच्या मनात नरखेड आणि मोवाड पोलीस स्टेशन हे अगदी जवळ असून सुधा इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध दारू विकल्या जाते हा प्रश्न निर्माण झालेला आहे .पोलिसांनी झालेल्या घटनेतील आरोपींना लवकर लवकर पकडून त्यांना कडक शिक्षा द्यावी आणि मृतक तसेच गंभीर व जखमी असलेल्यांना व्यक्तींना न्याय मिळवा .तसेच अवैध दोन नंबरचे धंदे बंद व्हावे अशी गावकरी जनतेत चर्चा सुरू असून त्यांचे म्हणे आहेत .



