
सावळी शिवारात तरुणाची निर्घुन हत्या आधी कापला गळा नंतर टायर टाकून जीवंत जाळले
काटोल तालुक्यातील रिधोरा येथील बिटू अशोक कडुकर चा सावळी नाल्यात जाळून खून झाल्याची घटना काटोल पोलीस अंतर्गत समोर आली आहे.. सविस्तर बातमी..
सावळी शिवारात तरुणाची निर्घुन हत्या आधी कापला गळा नंतर टायर टाकून जीवंत जाळले

मद्याच्या नशेत आरोपी नी आधी मारहाण व त्यानंतर गळा कापला त्यावरच त्यांचे समाधान न झाल्याने अंगावर पेट्रोल व टायर टाकून तरुणाला जीवंत जाळल्याची खळबळ जनक घटना सावळी परब शिवारात घडली़ याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे़ अंगद उर्फ बिट्टू अशोकराव कडूकर (28) असे मृतकाचे तर अक्षय रामदास घिचेरिया (31) रा़ रेस्ट हाऊस जवळ काटोल व मंगेश एकनाथराव जिचकार (32) रा़ धवड लेआऊट व गणेश चिरकुटराव नैताम (52) रा़ धर्मशाळा मागे तारबाजार काटोल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत़ घटनेच्या दिवशी गुरुवारला रात्री मृतक अंगद हा गावातील मित्र अमोल नागपूरे आणि वैभव हिवसे यांच्यासोबत दुपारी 3 वाजताच्या सुमारास रिधोरा येथून एमएच 04 एडब्लु 5123 क्रमांकाच्या क्वालिस गाडीने काटोल येथे जेवनाकरीता गेले़ यावेळी ते मद्य प्राशन करूनच होते़ तिघेही शेजारी एका ठिकाणी बसले तेथे त्यांनी पुन्हा मद्यप्राशन केले़ जवळच्या टेबलवर अंगदचा मित्र वैभवचा मित्र आरोपी मंगेश जिचकार बसला होता़ त्याच्यासोबत त्यांचा मित्र आरोपी अक्षय घिचेरिया व नैताम बसला होता़ त्यामुळे सहाही जण एकाच टेबलवर मद्यप्राशनासाठी बसले़ दरम्यान वैभवला जास्त झाल्याने जिचकार यांने वैभवला घरी रिधोरा येथे सोडून देऊ. झुनका भाकर केंद्रावरच सोडून अंगद, वैभव, अक्षय, मंगेश व नैताम रिधोऱ्याकडे निघाले़ परंतु वैभव ला बस स्टॅन्ड सोडून अंगदला डोगरगाव परिसरात घेऊन गेले़ तेथे त्यांच्यात वाद झाला़ त्यानंतर आरोपींनी अंगदला मारहाण केली व सावळी परब शिवारात नेऊन रस्त्याच्याकडेला फेकून घराकडे गेले़.अंगदला मारहाण केल्यानंतर पत्नीला मी एका जणांची हत्या केली असल्याचे मुख्य आरोपी अक्षयने पत्नीला सांगितले़ पत्नीने ही गोष्ट देवेंद्र खरपुरीया यांना सांगितली़ देवेंद्र व शुभम खानकोजे यांना घेऊन आरोपी घटनास्थळावर गेला असता तेथे त्याला अंगद जीवंतच दिसून आल्याने आरोपीने खिशातील चाकू काढून अंगदचा गळापासून त्यांची हत्या केली़ व परत घरी आला़ आपण हत्या तर केली आहे़ आता मृतदेहाची विल्हेवाट लावयची म्हणून मुख्य आरोपीने पुन्हा आपली दुचाकी काढली व काही टायर व पेट्रोल घेऊन सावळी शिवार गाठले आताही अंगद जीवंतच होता़ त्यांच्या अंगावर टायर व पेट्रोल टाकून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला जीवंत जाळले़ कारच्या स्थितीवरून बाळावला संशय
रात्र होऊनही अंगद घरी न आल्याने घरच्यांनी त्याचा शोध सुरू केला़ अंगद आरोपींसोबत असल्याचे काही व्यक्तींनी सांगितल्याने त्यांना विचारपूस करण्यात आली़ त्यावर अंगद काही वेळाआधीच गेल्याचे आरोपींनी सांगितले़ कुटुंबियांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात काही गोष्टींची तुटफुट झाल्याचे दिसून आल्याने अंगद सोबत काही तरी अपरिचीत घडल्याचा संशय बळावला़ दरम्यान देवेंद्र खरपुरीया यांने पोलिसांना माहिती दिली़ की आरोपीने अंगदची हत्या केली आहे़ तोच पोलिसांनी आरोपींला अटक केली़ त्यानंतर त्याच्या इतर साथीदाराना अटक करण्यात आली़



