मतदान करणे ही काळाची गरज — पीएमश्री नगर परिषद हायस्कूल क्र. २ मध्ये पथनाट्य सादरीकरण

 

मतदान करणे ही काळाची गरज — पीएमश्री नगर परिषद हायस्कूल क्र. २ मध्ये पथनाट्य सादरीकरण

काटोल : आगामी काटोल नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दि. २ डिसेंबर २०२५ रोजी पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर मतदार जागृती घडवून आणण्यासाठी पीएमश्री नगर परिषद हायस्कूल क्रमांक २ तर्फे प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मा. पियुषजी चिवंडे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच प्रशासक / मुख्याधिकारी मा. सुनील बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ‘मतदान हे श्रेष्ठदान’ या विषयावर पथनाट्याची रचना व सादरीकरण केले.

पथनाट्यातून नागरिकांना कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता, जात–धर्माच्या भेदभावाला दूर ठेवून, संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क निर्भीडपणे बजावण्याचे संदेश देण्यात आले. लोकशाही बळकटीसाठी प्रत्येक मतदाराचे मतदान करणे ही काळाची गरज असल्याचे प्रभावीपणे मांडण्यात आले.

या कार्यक्रमास उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, प्रशासन अधिकारी रविंद्र इंगळे, आरोग्य निरीक्षक विजय ठाकरे, होगीराज अरखेल, ग्रंथपाल राजेंद्र राऊत, मुख्याध्यापक प्रदीप शेटे तसेच शिक्षक व कर्मचारी — वासिम पठाण, महेश तिवारी, नवनीत मसराम, श्रीराम घाईट, सौ. रुपाली डोंगरे, सौ. सीमां बेलसरे, सौ. ज्योती भांगे, लीलाधर अडागळे — यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या या पथनाट्याने मतदार जागृतीचा संदेश प्रभावीपणे पोहोचवून उपस्थितांची प्रशंसा मिळवली.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close