वंदे मातरम सार्थ शताब्दी सोहळा पार पडला.


काटोल येथील नबीरा महाविद्यालयाच्या मैदानावर ७ नोव्हेंबर २०२५ रोजी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने “वंदे मातरम् – सार्थ   शताब्दी महोत्सव” कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष एसडीओ श्री. पियुजी चिवंडे तर मुख्य वक्ते महाराष्ट्र शासन नामनिर्देशित वक्ते डॉ. चंदू रामाजी देशपांडे होते. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार श्री. गणवीर, नगरपरिषद सीईओ श्री. बोरीकर, पोलीस निरीक्षक श्री. शिरसाट, विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य व अधिकारी उपस्थित होते.

सकाळी १० वाजता ४००० विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन “वंदे मातरम्” गीत सादर केले. देशभक्तीपर पथनाट्य सादर झाल्यानंतर डॉ. देशपांडे यांनी “वंदे मातरम् ते वंदे भारत” या विषयावर ऐतिहासिक आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र व विश्वगुरू बनविण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अजय खडसे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. प्रशांत राऊत यांनी केले. तहसील कार्यालय, आयटीआय काटोल, नबीरा महाविद्यालय व विविध शाळांच्या सहयोगाने कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close