
काटोलमध्ये सुरक्षा विधेयकावर तीव्र विरोध; स्थानिक समस्यांवरही नगर परिषदेकडे निवेदन
काटोलमध्ये सुरक्षा विधेयकावर तीव्र विरोध; स्थानिक समस्यांवरही नगर परिषदेकडे निवेदन

काटोल | प्रतिनिधी : लोकशाहीची गळचेपी करणारे विधेयक तात्काळ मागे घ्या – नागरिकांची मागणी
राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या सुरक्षा विधेयकाचा काटोलमध्ये तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. नागरिक प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी पीयूष चिवंडे यांना निवेदन देत हे विधेयक तात्काळ मागे घेण्याची मागणी केली.नागरिकांनी यावेळी स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त करत, “हे विधेयक लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना धक्का देणारे आहे,” असे मत मांडले.नगर परिषदेकडे पाणीपट्टी, स्वच्छता व रस्त्यांच्या प्रश्नांवर चर्चा सुरक्षा विधेयकावरील निवेदनानंतर, नागरिकांनी नगर परिषद कार्यालयात बैठक घेऊन स्थानिक समस्यांवर अधिकाऱ्यांशी चर्चा केली.मुख्य समस्या:वाढती पाणीपट्टी,पाण्याचा तुटवडा,शहरातील अस्वच्छता,वीज व रस्त्यांची दयनीय स्थिती,नगर परिषद मुख्याधिकारींसमोर नागरिकांनी हे प्रश्न मांडले.
अनिल देशमुख यांची उपस्थिती; लोकशाही रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन, बैठकीला माजी गृहमंत्री व काटोलचे माजी आमदार अनिल देशमुख उपस्थित होते. त्यांनी नागरिकांच्या समस्या समजून घेत प्रशासनाशी चर्चा केली व “शक्य तितक्या लवकर योग्य निर्णय घेऊ,” असे आश्वासन दिले.सुरक्षा विधेयकावर भाष्य करताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आणि “लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे,काटोलमध्ये सुरक्षा विधेयकाविरोधात निवेदन,स्थानिक पाणी व स्वच्छतेच्या समस्या ऐरणीवर,माजी आमदार अनिल देशमुख यांचे प्रशासनाला निर्देश
