अनैतिक संबंधात अड्सर येणाऱ्या पतीची पत्नीने केली हत्या

अनैतिक संबंधात अड्सर येणाऱ्या पतीची पत्नीने केली हत्या
नागपुरात समाजाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे, तरोडी साईनाथ सोसायटीत राहणाऱ्या दाम्पत्यातील 38 वर्षीय अपंग पतीची प्रियकरच्या मदतीने पत्नीने गळा आवरून हत्या केली. ही घटना 4जुलै ला घडली असून वाठोडा पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.
नागपूर तारोडी साईनाथ सोसायटी परिसरात अपंग पतीची हत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात असून हत्या करणाऱ्या पत्नीचा विरोधात परिसरात रोष व्याप्त आहे. मृतक चंद्रसेन बाळकृष्ण रामटेके 38 हा एक,
दिढ वर्षा पासुन लकवा ग्रस्त होता. यामुळे तो घरी राहत असे, दिशा चंद्रसेन रामटेके ने आपल्या उदरनिर्वाह करीता वाटर प्लांट सुरु केला होता. या दरम्यान आसिफ अन्सारी नावाच्या मिस्त्री शी तिची ओळ्ख झाली आणि दोघात अनैतिक सबंध निर्माण झाले. अनैतिक संबंधा मुळे पती आणि पत्नीत झगडे भांडण होत होते. नेहमी होत असलेल्या विवादा मुळे दिशा चंद्रसेन रामटेके ने आपल्या प्रियकरा च्या मदतीने हत्या करण्याच्या कट रचला. चार जुलै च्या दुपारी चंद्रसेन घरी झोपला असतांना आसिफ अन्सारी व दिशा ने उशी तोंडा ठेऊन आणि गळा आवळून हत्या केली. परंतु मृतदेह दोन तास त्याच ठिकाणी पडून राहू दिला. नंतर मेडिकल ला नेऊन तेथे खोटी तक्रार नोंदविली. परंतु पोस्टमाटर्म रिपोर्ट मधुन हत्ये चा खुलासा समोर आला. पोलिसांच्या खाक्या नंतर दिशा आणि आसिफ नी गुन्हा कबूल केला , दोघांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close