
गट ग्रामपंचायत गोन्ही येथे स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा
गट ग्रामपंचायत गोन्ही येथे स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा
काटोल तहसील अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत गोन्ही आणि जिल्हा परिषद शाळा गोन्ही येथे मोठया उत्सहात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला . या पर्वावर ग्रामपंचायत सदस्य विक्की पाटील यांनी गावातील मुलांना सगणाकाची माहिती अवगत व्हावी म्हणून आणि जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्याकरीता लॅपटॉप शाळेला भेट दिला, या उपक्रमाची गावकऱ्यांकडून स्तुती होत आहे.
या वेळी सरपंच विजय उईके मान्यवरांनी मार्गदर्शन केले उपसरपंच राजेंद्र मोरोलिया , साधना बासेवार सद्स्या, वंदना पाटील सदस्या,शाळा सुधार समितीचे अध्यक्ष सुरतराव मुरोडिया ,विनोद कुमेरिया उपाध्यक्ष सदस्य,वीरेंद्र पडोलीय सदस्य, पंजाब पाटील सदस्य, कैलास किसोनिया सदस्य, दशरथ मोरोलिया सदस्य,महेंद्र जुगसेनिया सदस्य, हिरालाल मोरोलिया पोलीस पाटील,फुलदास बासेवार आणि मोठया संख्येत उपस्थित होते. J
