तरूणांची दादागिरी, ड्युटीवरील पोलिसावरच उचलला हात,

मुंबई |  बुधवारी (18 ऑक्टोबर) X वर (पूर्वीचे ट्विटर ) एक व्हिडीओ समोर आला होता. एक पोलीस अधिकारी कथिपणे काही विद्यार्थ्यांशी भांडण करत असल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. मात्र आता त्याच पार्अशवभूमीवर एक नवा व्हिडीओ बाहेर आला आहे, त्यात उपद्रवी तरुणांचा एक गट ड्युटीवर असलेल्या एका पोलिसाला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. तसेच त्याला उद्देशून गैरशब्द वापरत टोमणेही मारत असल्याचे व्हिडीओतून समोर आले. काही तरूणांनी तर त्या पोलिसाला शिवीगाळही केली. हा संपूर्ण प्रकार काही लोकांनी कॅमेऱ्यात कैद केला. तर इतर काहींनी त्या तरूणांना रोखत मारहाण न करण्याचा सल्ला दिला. मात्र त्या तरूणांनी रस्त्यावरील त्या इसमांनाही उद्धटपणे उत्तर दिले.त्या तरूणांनी धक्कादायकपणे कृती करत ड्युटीवर असलेल्या, वर्दी घातलेल्या त्या पोलिसाला अक्षरश: बेदम चोप दिला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर बराच गदारोळ माजला आहे. याप्रकरणी पुढील चौकशी करण्यात येत आहे.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close