आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ.. बुलढाण्यातील घटनेने खळबळ

आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ.. बुलढाण्यातील घटनेने खळबळ
बुलढाणा जिल्ह्यातील एका रुग्णालयात एक अद्भुत घटना घडली आहे. गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटात आणखी एक बाळ असल्याचे सोनोग्राफीमध्ये आढळून आले आहे. हे ‘फीटस इन फीटू’ नावाच्या दुर्मिळ वैद्यकीय स्थितीचे उदाहरण आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात मोठी चर्चा निर्माण केली आहे.
देवाची करणी आणि नारळात पाणी.. अशी एक म्हण आपल्यापैकी बऱ्या लोकांनी आत्तापर्यंत ऐकली असेल. म्हणजे निसर्ग किंवा देव काहीही करू शकतो, असा काहीसा त्याचा अर्थ. या निसर्गात, सृष्टीत असे काही प्रकार घडतात, काही अशी गूढ असतात ज्याचा आपल्या मतीला अर्थ लागू शकत नाही. असाच काहीसा प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. तेथे एक गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी रुग्णालयात गेली होती. मात्र त्या महिलेच्या पोटात जे बाळ होतं, त्याच बाळाच्या पोटात आणखीन एक बाळ असल्याचे उघडकीस आलं आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षांची एक महिला 3 दिवसांपूर्वी सोनोग्राफी करण्यासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आली होती. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. या महिलेला आधी 2 अपत्यं असून ती तिसऱ्यांदा गर्भवती आहे. सोनोग्राफी करताना त्या महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटात आणखी एक बाळ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आलं. निसर्गाने मानवाची अशा प्रकारे रचना केली आहे की विशिष्ट वयानंतर आणि शरीर रचनेत बदल झाल्यानंतर महिला प्रजनन करण्यास सक्षम होतात. मात्र, महिलेच्या पोटात बाळ आणि त्याच बाळाच्या पोटात आणखी एक बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही अचंबित झाले. 9 महिन्यांच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत आहे.
मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला ‘फीटस इन फीटू’ असे म्हणतात. अर्भकांमध्ये अर्भक असणे ही अशी घटना आहे. यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असते. साधारणत: 5 लाख गर्भवती महिलांमध्ये एखादीच्या बाबतीतच अशी केस एखादी आढळते. सध्या त्या बाळाच्या जीवाला काहीही धोका नाही, मात्र त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर अडचणी निर्माण होऊ शकतात अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भागवत भुसारी यांनी दिली आहे. त्या बाळाचा जन्म झाल्यानतर परिस्थिती काय असेल, त्यानुसार निर्णय घेऊ, त्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज ठेऊ असेही डॉक्टरांनी नमूद केलं.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close