बीड जिह्यातील सरपंच संतोष देशमुख याची हत्या

राज्यात गाजणारे प्रकरण बीड जिह्यातील सरपंच संतोष देशमुख याची हत्या

या प्रकरणात दर रोज अनेक खुलासे होत आहे,

आता तर बीड येथील सायबर पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित गंगाधर कासलेनी राजकर्त्यावर आरोप केला

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी वाल्मीक कराडचा एन्काउंटर करण्याचा कट रचल्याचा थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरच आरोप करणारी चित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित करत राज्यभर खळबळ उडवून दिली.

त्यामुळे बीड येथील सायबर पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित गंगाधर कासले याला शुक्रवारी पुण्यात अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना दुपारी बीडमध्ये आणण्यात आले. त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांच्या कडून प्राप्त झाली.

तत्पूर्वी गुरुवारी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी कासले ला सेवेतून बडतर्फ केले.
कासले यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी गुजरातमध्ये गेले असता तेथील आरोपीस सोडून दिल्याची एक चित्रफीत प्राप्त झाली. त्याची सत्यता पडताळण्यात आली. कासले यांनी माहिती-तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देऊन पैशांची मागणी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर २३ मार्च रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close