
याज्ञवलक्य की जिचकार यांची काँग्रेसमध्ये घर वापसी
याज्ञवलक्य की जिचकार यांची काँग्रेसमध्ये घर वापसी

Lकाटोल मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सलील देशमुख यांच्याविरुद्ध बंडखोरी करीत निवडणूक लढणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत डॉक्टर श्रीकांत जिचकर यांचे चिरंजीव याधान्यवळक्य जिचकार यांची काँग्रेसमध्ये घर वापसी झाली आहे.विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांच्या वर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.ती मागे घेऊन त्यांना गुरुवारी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश देण्यात आला.टिळक भवन मुंबई येथे प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे उपस्थित जिचकर यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वेडट्टीवार गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे आमदार नाना पाटोले आदी उपस्थित होते. आपण काँग्रेसच्या विचारशी पाईक असून काँग्रेसची विचारधारा तरुण वर्गात रुजवण्यासाठी काम करीत आहे. काँग्रेस पक्षात तरुणांना नेतृत्व करण्याची संधी दिली जाते काँग्रेस पक्षाचा विचार देशाला तारणारा असल्याची प्रतिक्रिया जिचकार यांनी यावेळी दिली.जिचकार यांच्यानंतर रामटेक मतदारसंघात महाविकास उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवणारे माजी मंत्री राजेंद्र मुळक, चंद्रपाल चौकशे यांच्या सह इतरांचे निलंबन मागे घेतले जाणार असल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात आहे.
