
नागपूरजिल्ह्यामध्ये 300 विद्यार्थ्यांनी गाजवली ‘अबॅकस’ स्पर्धा
-

oplus_34 नागपूर: क्यूबॅटिक एड्युटेक प्रा. लि. (बेंगळुरू) आणि ऑरचीड पब्लिक स्कूल,व आई क्यु एस पार्क काटोल 7 वी झोनल स्तरावरील अबॅकस आणि मेंटल अरिथमेटिक स्पर्धा नागपूरजिल्ह्याच्या काटोल मध्ये पार पडली. या स्पर्धेत नागपूर, अमरावती, काटोल, कारंजा , सावरगाव, नरखेड, कोंढाळी , कलमेश्वर, हिंगणा यासह महाराष्ट्राच्या

oplus_0 विविध भागांतील जवळपास 300 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ 10 मिनिटांत बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यांसारखी एकूण 200 गणिती प्रश्न सोडवण्याचे आव्हान देण्यात आले होते. ही स्पर्धा केवळ गणिताच्या कौशल्याचीच नव्हे, तर गती, अचूकता, एकाग्रता, स्मरणशक्ती, वेळेचे व्यवस्थापन आणि मानसिक संतुलन तपासणारी होती.
कार्यक्रमाला माजी शिक्षण सभापती उकेश चौहान, श्री सत्यसाई विद्यालयाचे प्राचार्य निलेश सोनटक्के, बी. आर. हायस्कूलचे शारीरिक शिक्षक धीरज ढोले आणि काटोल व कारंजा फ्रँचायसीच्या मॅनेजिंग डायरेक्टर श्रीमती शोभना मस्के यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण कामगिरीचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कठोर परिश्रमामुळे स्पर्धकांनी अप्रतिम प्रदर्शन केले. विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. या वेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
