काटोल मधील कबड्डी सामन्याचे प्रथम बक्षीस चांदूरबाजार ला

fकाटोल मधील कबड्डी सामन्याचे प्रथम बक्षीस चांदूरबाजार ला

काटोल मध्ये आठ राज्यस्तरीय स्पर्धा झाल्यात : अनिल देशमुख


 मराठा लान्सर क्लबच्या वतीने स्वर्गीय प्रदीप भाऊ देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ काटोलच्या जिल्हा परिषद शाळेच्या प्राणांगणावर तीन दिवसीय कबड्डी सामने पार पडले. या तीन दिवशीय स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी केले या उद्घाटन प्रसंगी सलिल देशमुख यांनी मराठा लान्सर क्लब ने काटोल शहराचे नाव लौकिक केले आहे. मराठा लान्सरला मोठे योगदान स्व.प्रदीपभाऊ देशमुख यांनी केल्यामुळे त्यांच्या स्मृती स्पर्धा होत आहे असे प्रतिपादन देशमुख यांनी केले. त्याचप्रमाणे बक्षीस वितरण माजी गृहमंत्री देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.शेवटचा अंतिम सामना हा वाशिम विरुद्ध चांदूरबाजार संघात झाला.चांदूरबाजार संघाने प्रथम बक्षिसाचे पटकावला यावेळी गृहमंत्री देशमुख यांनी मार्गदर्शनात म्हणाले काटोल शहरात अनेक स्पर्धा झाल्यात त्यात आठ राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सर्वात जास्त काटोल मतदार क्षेत्रात स्पर्धा झाल्यात येणाऱ्या दिवसांमध्ये मराठा क्लबला आमचे सहकार्य राहील.पहिले बक्षीस पटकवणाऱ्या चांदुर बाजार संघाला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते प्रथम बक्षी देण्यात आले तर त्यांचा गौरव सुद्धा करण्यात आला. यावेळी हजारो नागरिक स्टेडियम वर उपस्थित होते तर मंचावर माजी खासदार प्रकाश जाधव, अमरावतीच्या महापौर सौं किरणताई म्हल्ले, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर कोल्हे,अनुप खराडे,सुरेश परबत,मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम,विजुभाऊ ताटे उपस्थित होते
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close