
काटोलात 85 वर्षाची गळाची प्रथा आजही सुरु आहे, होळी च्या
नागपूर जिल्ह्यातील काटोल शहरात परंपरागत 85 वर्षाची गळाची प्रथा आजही सुरु आहे, होळी च्या पर्वा वर रंगपंचमी ला गळाची यात्रा असते, यात्रेत हजारो भाविक भक्त येऊन सहभागी होतात, सांगण्यात येते आपल्या मुलाचा नवस म्हूणन धवड परिवारातील सदस्य गळी लागतो. 14 मार्च 2025 ला रंगपंचमी असल्याने काटोल येथील गळपुरा चौकात गळाची यात्रा होती, आपण बघत असाल कि हजारो नागरिक या यात्रा बघायला आले, सर्वत्र नजर जाईल तेथे जणसमुदाय दिसत आहे. गळी लागणार भक्त आपल्या प्रथे नुसार पूजा अर्चना करून एका मोठया खबाला बांधला जातो त्या भक्ताला फेरे दिल्या जातात. ही श्रद्धा भगवान गडोबा यांच्या वर असून गडोबा आशीर्वादा असल्याने ही गळी लागण्याची प्रथा कायम आहे. ही काटोल ची गडोबाची यात्रेला 25 ते 50 कि मी अंतरावरून परिसरातील नागरिक येतात. तर या यात्रेत आपली दुकानें लावून यात्रेकरी सेवा देतात, तर पोलीस विभाग कडून चोख बदोबस्त लावून अनुचित प्रकार घडू नये दखल घेतात. अशा प्रकारे काटोल ची गळ्यात्रा असते बघत आहात
