नरखेडच्या गुरांच्या बाजारात व्यापारी शेतकऱ्यांची लूट

 

नरखेडच्या गुरांच्या बाजारात व्यापारी शेतकऱ्यांची लूट
नरखेड तालुका संत्रा बाजार आणि गुराच्या बाजारासाठी नागपूर जिल्ह्यात प्रसिद्ध असला तरी या बाजारात व्यापारी आणि शेतकऱ्याची लूट सुरू आहेत.
नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे अंतर्गत येणाऱ्या गुरांच्या बाजारात मध्य प्रदेश अमरावती जिल्हा, वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा अशा अनेक जिल्ह्यातून नरखेड च्या गुरांच्या बाजारात शेतकरी वर्ग आपली पशुधन व जनावर विक्रीकरिता आणतात.शेतकरी वर्ग उन्हाळ्यात आपले जनावरे खाद्याचे अभावी विकतात.त्यामुळे नरखेडच्या गुराच्या बाजारात मोठ्या प्रमाणात जनावराची आवक आहे. यावेळी हजारो


जनावर नरखेडच्या बाजारात येत असल्याने काही दलाल आणि राजकीय संस्था तसेच पोलीस विभागाचे वसुली पथक सक्रिय होत आहे.

आमच्या प्रतिनिधींनी या बाजारात जाऊन आढावा घेतला असता वसुली करणारे राजकीय दल हजारो रुपये गुरांच्या व्यापार करणाऱ्या व्यावसायिकाकडून उकळत आहे तर वाहतूक पोलीस एका गाडीमध्ये ठरवलेली रक्कम वसूल करतात हा प्रकार सगळा बाजार समितीचे आवरत करता येत नसल्याने रोडवर उभे राहून वसूल करत असतात.एवढेच नव्हे तर शेतकरी वर्गाला दमदाटी करतात. यासाठी वाहतूक पोलिसांनी खाजगी एजंट लावले असल्याची चर्चा असल्याची माहिती समोर आली आहे.आता रक्षक भक्षक बनले असा सवाल व्यापारी वर्ग व शेतकरी वर्ग करीत आहे.त्यामुळे सामान्य नागरिक कुणाकडे न्याय मागणार असा सवाल उपस्थित होत असून नरखेडच्या गुरांच्या बाजारात होत असलेली लूट थांबावी अशी मागणी होऊ लागली आहे. पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी अवैध वसली करणारे एजंट यांच्यावर कारवाई व पोलीस नरखेडचे वाहतूक नियंत्रक यांनी सुद्धा पोलिसाच्या नावावर आपले दलाल काम करीत आहेत त्यांना समज देऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होत आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close