
धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
अनिकेत सुर्यवंशी जिल्हा प्रतिनिधी
महागाव : महागाव येथील एल के – कॅान्व्हेट शाळेच्या हाॅलमध्ये महागाव तालुक्यातील इयत्ता दहावी व
बारावी मधील धनगर समाजाचे गुणवंत विद्यार्थ्यांचा , कर्मचाऱ्यांचा व समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांचा धनगर अधिकारी कर्मचारी संघटना शाखा महागावच्या वतीने सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनगर अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष माननीय श्री पवनजी थोटे तर प्रमुख पाहुणे म्हणून धनगर समाजाचे जेष्ठ नेते काँग्रेसचे अँड. सचिनजी नाईक ,सेवानिवृत्ति आर.टि.ओ गोविंदरावजी तास्के ,सेवानिवृत्त लेखा अधिकारी सुभाषजी बोडखे ,नारायणराव पाटील , महागाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोलजी चिकने ,बबनरावजी कोरके सर, संजय पाटे ,बा.ना.सु.संचालक श्री. स्वप्निल नाईक हे होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इयत्ता दहावी, बारावी,सीईटी,नीट परिक्षेत महागाव तालुक्यातील साठ विध्यार्थ्यांना ट्राॅफी आणि सन् मानपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. पुढील सत्रात दहावी ,बारावी मध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय गुण प्राप्त करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी पहिले बक्षीस मनोज अनुसे यांनी ५००० पाच हजार रुपये दुसरे बक्षीत सदानंद लहेवार यांनी ३००० रु. तीन हजार रुपये व तिसरे बक्षीस शिवाजी टेकाळे सर यांनी २००० रु दोन हजार रुपये देण्याचे या ठिकाणी जाहीर केले. या कार्यक्रमाला महागाव तालुक्यातील धनगर समाजातील मंडळी ,पाटील सर सदानंद लाहेवार, मंचकराव गोरे , शरद काकडे,राजेश हिंगाडे, संतोष कोरडे, मनोज फटींग ,मस्के साहेब, नंदकिशोर पानोडे ,बबनजी मोहटे ,मनोज अनुसे हे होते. या कार्यक्रमाचे आयोजन महागाव तालुका धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेने केले होते. सुत्रसंचलन गजानन काळसरे यांनी केले तर आभार सचिन खटके यांनी मानले यावेळी असंख्य समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थिति होते .
ईश्वर देशमुख सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवले यश
अनिकेत सुर्यवंशी जिल्हा प्रतिनिधी
दिग्रस : तालुक्यातील सावंगा बु.येथील ईश्वर देशमुख शाळेच्या ६ खेळाडुंनी ७ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हा स्तरीय ज्युडो स्पर्धेमध्ये द्वितीय स्थान तर तालुका क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले.त्यांचे सर्वस्तरावरुन कौतुक होत आहे. नुकत्याच झालेल्या स्तरीय योगासन स्पर्धेमध्ये १४ वयोगटातील शुभम संतोष डाखोरे – प्रथम,ओम दिपक डाहाने – द्वितीय,सोहम विशाल मडावी -तृतीय,स्वराज राजेश नेमाने – पाचवा,तर १७ वयोगटांतील गौरव गोपाल सोनोन -द्वितीय शिवम किसन पारधी – चौथा या विध्यार्थ्यांची तालुका स्तरीय योगासन स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. तसेच शालेय जिल्हा स्तरीय ज्युदो स्पर्धो दिग्रस १४ वयोगटातील शेख मोईन शेख युनुस ( वजन -२५ किलो) – द्वितीय क्रमांक, शामराव पानबुडे ( वजन -३० किलो ) -द्वितीय क्रमांक तर १७ वयोगटातील जयंत खराटे ( वजन – ४० किलो )द्वितीय क्रमांक, सुमित शेकळे (वजन -४५ किलो ) द्वितीय क्रमांक, समाधान खंदारे ( वजन – ५० किलो ) द्वितीय क्रमांक ,प्रणव बोरचाटे ( वजन -६० किलो ) द्वितीय क्रमांक पटकविला .विजयी खेळाडुंचे व या स्पर्धेकरीता अथक परिश्रम करणारे क्रीडा शिक्षक सादिप ,अगाऊ ,डुकरे यांचे शाळेचे अध्यक्षीय माजी राज्यमंत्री संजय देशमुख ,सचिव वैशाली देशमुख , उपाध्यक्षपदी कु. साक्षी देशमुख व मुख्याध्यापक नितीन धनवंत व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी खेडाळूचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. विशेष म्हणजे योगासन स्पर्धेमध्ये शाळेने पाहिल्यांदाच सहभाग घेतला न सहा खेळाडुंची जिल्हा स्पर्धेमध्ये निवड झाली आहे .



