
काटोल येथे जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्राकरिता प्रवेश परीक्षा
काटोल येथे जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्राकरिता प्रवेश परीक्षा
काटोल – मानव विकास कार्यक्रम व विदर्भ विकास मंडळ अंतर्गत जिल्हा परिषद , नागपूर द्वारे संचालित जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे सुरू झालेले आहे.माजी गृहमंत्री तथा आमदार अनिलबाबू देशमुख यांच्या अथक प्रयत्नामुळे व जि.प.सदस्य सलीलदादा देशमुख व माजी जि.प.सदस्य चंद्रशेखरजी कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे अभ्यासकेंद्र उभारण्यात आले आहे.या स्पर्धा परीक्षेतुन निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत उच्च पदावर पोहचण्याकरिता मार्ग उपलब्ध होईल.अभ्यासकेंद्रात अडीच हजार पुस्तके, तीस संगणक, इंटरऍक्टिव्ह बोर्ड उपलब्ध असून अतिथी मार्गदर्शन सुविधा उपलब्ध होणार आहे.तसेच व्यक्तिमत्त्व विकासास पूरक उपक्रम आयोजित केले जाते.ही सुविधा स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच असणार आहे.अभ्याकेंद्रात प्रवेशाकरिता प्रवेश परीक्षा असणार आहे.त्याकरिता इयत्ता बारावी उत्तीर्ण कोणताही विद्यार्थी “प्रवेश परीक्षा -२०२२” करिता पात्र आहे.प्रवेश परिक्षेकरिता बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व इंग्रजी व्याकरण, सामाजिक शास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान, चालू घडामोडी व स्थानिक माहिती इत्यादी अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे.जि.प.कन्या शाळा, काटोल येथे दि.१० मार्च पर्यत फॉर्म भरता येईल.प्रवेश परीक्षा दि.१३ मार्च ला बी.आर.हायस्कूल, काटोल येथे आयोजित केली आहे.तेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दयावी असे आवाहन गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के व शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर यांनी केले आहे.
