महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस

मुबंई : आझाद मैदानावर महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा 5 डिसेंबर ला पार पडणार आहे.महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस  भाजप चे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आजच खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आज शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक मंत्रालयात पार पडणार आहे. यावेळी कोणता निर्णय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्रि‍पदाचा मार्ग मोकळा झाला. यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी काल एकत्र राजभवनात दाखल होत सत्तास्थापनेचा दावा केला. आज अखेर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यानुसार देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तर अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.हळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला 22 राज्याचे उपमुख्यमंत्री देखील हजेरी लावणार आहेत. या सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी तब्बल 40 हजार लोक एकत्र बसतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. हा संपूर्ण स्टेज आणि मंडप भगव्या रंगाचे असणार आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close