
खेडी गो. गो. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती वाचनालयाचे उद्घाटन
- खेडी गो. गो. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती वाचनालयाचे उद्घाटन
नरखेड प्रतिनिधी : खेडी गो. गो. (ता. नरखेड) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती वाचनालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गट ग्रामपंचायत खेडी गो. गो. मन्नाथ व पंचायत समिती नरखेड यांचे सहकार्याने वैशाली बौद्ध विहार येथे हे वाचनालय सुरू करण्यात आले आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना गट ग्रामपंचायत खेडी गो. गो. मन्नाथच्या विद्यमान सरपंच सौ. नंदाताई अनिलजी बांदरे यांनी सांगितले की, या वाचनालयाच्या माध्यमातून दुर्लक्षित घटकांतील गावातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल. वाचनालयामध्ये एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
सोमवार, दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 12 वाजता वाचनालयाच्या फलकाचे अनावरण व फीत कापून उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाचा मान सरपंच सौ. नंदाताई अनिलजी बांदरे यांना लाभला.
यावेळी उपसरपंच कु. साहिलजी ढोके, माजी सरपंच श्री. अनिलजी बांदरे, ग्राम अधिकारी/सचिव श्री. गजाननजी शेळके, सरपंच सदस्य श्री. दीपकजी बागडे, राजेंद्रजी काळबांडे, सौ. जयश्रीताई बागडे, अरुणाताई ठाकरे, रोशनीताई वरठी, हर्षाताई उईके, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. प्रमोदजी सोमकुवर, बुद्ध विहार समिती अध्यक्ष श्री. युवराजजी बागडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच श्री. सुनीलजी बागडे, श्री. भीमरावजी बागडे, श्री. रमेशजी बागडे, श्री. सुभाषजी मुंगभाते, श्री. बंडूजी राऊत, श्री. शरदजी तागडे, श्री. मनोजजी बागडे, श्री. विलास बागडे, विशाल सोमकुवर, श्री. चंद्रभानजी बागडे, श्री. एकनाथजी गजभिये, श्री. नागोलालजी बागडे, अतुल बागडे, प्रणय सरोदे, आशा वर्कर सौ. छायाताई पाटील, पोलीस पाटील वर्षाताई मरस्कोल्हे, अंगणवाडी सेविका मुद्रिका ताई बागडे, सौ. यशोधराताई गोलाईत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Live Cricket
Live Share Market
