
विस्तारा वर वीट आलेला आहे – बच्चू कडू
महाराष्ट्रा मध्ये वर्षभरापासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र अजूनही विस्तार होत नाहीयेत. मंत्रिमंडळ विस्ताराकडे अनेक आमदार डोळे लावून आहेत. शिंदे गट आणि भाजपचे मित्र पक्षही या विस्ताराची वाट पाहून आहेत. जेव्हा जेव्हा विस्ताराची चर्चा होते, तेव्हा तेव्हा या इच्छुकांकडून सेटिंग आणि लॉबिंगही केली गेली. पण प्रत्येकवेळी विस्ताराची चर्चा ही चर्चाच ठरली. राष्ट्रवादीचा एक गट सरकारसोबत आला आणि सत्तेत सहभागीही झाला. पण इच्छुकांना अजून सत्तेची दारं उघडली नाहीत. त्यामुळे अनेकजण वैतागले आहेत. प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री बच्चू कडूही विस्तार होत नसल्याने उद्विग्न झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल हे मला माहीत नाही. मी विस्ताराची न्यूज आता पाहत नाही, असा वैताग बच्चू कडू यांनी व्यक्त केला. प्रहारने मंत्रीपदाची मागणी केली आहे. पण मी मंत्रिपद घेणार नाही. राजकुमारसाठी मंत्रिपद ठेवणार आहे, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.
Live Cricket
Live Share Market