गुजरात जिंकण्याचा केजरीवाल चा प्लॅन

भाजपने 15 लाख देणार असल्याचे सांगितले होते.

Arvind Kejriwal : गुजरातमध्येही फ्री वीज देणार, मोदीचं गुजरात जिंकण्याचा केजरीवालांनी आखला प्लॅन, यश येणार?

गरिबांच्या जेवणावरही टॅक्स, श्रीमंतांचे 5 लाख कोटी माफ, वाह रे सरकार, अरविंद केजरीवाल भाजपवर बरसलेच

नवी दिल्ली :गुजरात जिंकण्याचा केजरीवाल चा प्लॅन – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  गुरुवारी गुजरातमध्ये पोहोचले. येथे त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाची  पहिली रणनिती जाहीर केली.   अरविंद केजरीवाल म्हणाले सध्या महागाई खूप वाढली आहे. ही एक मोठी समस्या आहे. विजेच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. जसे आम्ही दिल्लीत मोफत वीज दिली. पंजाबमध्ये तीन महिन्यांत मोफत वीज देण्यात आली. तसेच गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर मोफत वीज देऊ. तसेच मी गुजरातमध्ये पहिली हमी म्हणून मोफत वीज देण्याचे वचन देतो, असे म्हणत त्यांनी भाजपला धडकी भरवायला सुरू केलं आहे. यावेळी केजरीवाल म्हणाले भाजपने 15 लाख देणार असल्याचे सांगितले होते. मग ही निवडणूक नौटंकी असल्याचे सांगितले. ते फक्त म्हणतात पण आम्ही हमी देतो. आम्ही काम केले नाही तर पुढच्या वेळी मतदान करू नका, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close