
कर्तव्यदक्ष आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार समारंभ संपन्न; पालकमंत्री चंद्रशेखर बानकुळे आणि आशिष जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती
—
कर्तव्यदक्ष आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार समारंभ संपन्न; पालकमंत्री चंद्रशेखर बानकुळे आणि आशिष जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती
काटोल | प्रतिनिधी
काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष आमदार श्री. चरणसिंग ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन नुकतेच लक्ष्मीकमल सभागृह, काटोल येथे
उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती. समारंभाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पालकमंत्री, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल यांची उपस्थिती होती. त्यांनी आमदार चरणसिंग ठाकूर यांचे कार्य गौरवले आणि उपस्थित नागरिकांना मार्गदर्शनपर भाषण केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन झाली. त्यानंतर आमदार ठाकूर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. स्थानिक नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
आपल्या भाषणात मंत्री श्री. आशिष जैस्वाल म्हणाले, “चरणसिंग ठाकूर हे केवळ आमदार नसून ते एक खरे जनतेचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी नेहमीच विकासाच्या राजकारणावर भर दिला आहे. त्यांच्या माध्यमातून काटोल-नरखेड परिसरात विविध पायाभूत सुविधा, रस्ते विकास, जलसंधारण प्रकल्प आणि शिक्षण क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले गेले आहेत.”

कार्यक्रमात आमदार चरणसिंग ठाकूर यांनी भावनिक प्रतिसाद देताना उपस्थित सर्वांचे आभार मानले. “ही माझ्यासाठी केवळ वाढदिवसाची एक औपचारिकता नाही, तर जनतेच्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा साक्षात्कार आहे. माझ्या कार्यकाळात जनतेची सेवा हेच माझे ध्येय राहील,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध व भव्य स्वरूपात करण्यात आले होते. सभागृहात मोठ्या संख्येने नागरिक, महिलावर्ग, युवा कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
