
ज्या घरात सनई वाजली, तिथेच पसरली शोककळा ! तिच्यासोबत नेमकं काय झालं ?
एका नवविवाहीतेची तिथे निर्घृणपणे हत्या करणयात आली. मिळालेल्या माहितीनुसार, हुंडा म्हणून दुचाकी न दिल्याने विवाहितेचा खून करण्यात आला. तिचा पती आणि सासरच्या मंडळींनी मिळूनची ही हत्या केली आणि त्यानंतर घरातच खड्डा खणून मृतदेह पुरला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, याच वर्षी एप्रिलमध्ये त्या तरूणीचे लग्न झाले होते. महाराजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अराजी जजमान जोत गावात ही घटना घडली. मृत तरूणी अनिता, हिचा भाऊ हरेंद्र याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचे सासरे गुलाब आणि पती सूरजविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
हत्येची ही घटना घडल्यापासून आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे छापे सुरू आहेत. मृत तरूणीच्या भावाच्या सांगण्यानुसार, हुंडा म्हणून बाईक मागत, त्याच्या बहिणीचा अनेकदा छळ केला जात होता. गरीब आर्थिक परिस्थितीमुळे त्यांची मागणी पूर्ण होऊ शकली नाही. थोडं कर्ज घेतल्यानंतर स्वतःच्या खात्यातून 40 हजार रुपये जमा करून त्यांनी बहिणीच्या सासरच्या मंडळींना दिले, पण तरीही त्यांचे समाधान झाले नाही. तिचा पती अनेकदा बहिणीला मारहाण करायचा, असा आरोप त्याने लावला
Live Cricket
Live Share Market



