
कोंढाळीला कँडल रॅली
कोंढाळीला कँडल रॅली
कोंढाळी : लाखोटिया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोंढाळी येथे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ” उद्घाटन व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सुधीर बुटे यांच्या मार्गदर्शनात वाचनसत्राचे आयोजन करण्यात आले. मिडल स्कूल व हाय व कनिष्ठ महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी सहभागातून दोन टप्प्यात करण्यात आले. व्यासपीठावरील व इतर कार्यक्रमात उपमुख्याध्यापक कैलास थुल, जेष्ठ पर्यवेक्षक मनोज ढाले,हरीश राठी, परीक्षा विभाग प्रमुख सुनिल सोलव, प्रिया धारपुरे, संजय आगरकर आदींची उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सौ. अर्चना ढाले यांनी “अध्ययन प्रक्रियेतील व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकस मूल्यमापन” पाचदिवसीय प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शक यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.याप्रसंगी एकूण कनिष्ठ महा 170 व मिडल स्कूल 122 विद्यार्थी सलग चार- चार तास अभ्यास करण्यासाठी सहभागी झाले होते.आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा व वेशभूषास्पर्धा, विविध वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी मुलाखतीतून डॉ बाबासाहेब यांचे विचार मांडले. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक उत्सव समितीचे प्रमुख दुर्गा भट्टड ,संयोजक राहुल रक्षित, सहकारी शैलेश चव्हाण,रविंद्र जायभाये, तेजस राठी, मिनाक्षी बोन्द्रे,प्रकाश मलवे, शुभम राऊत अहवाल लेखन व छायाचित्रे राहुल रक्षित, शैलेश चव्हाण यांनी केले.या कार्यक्रमाला संस्थेचे शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.संचालन विद्यार्थी भूमिका पोकळे, देवयानी वंजारी तर, आभार जानवी डांगरे हिने मानले.बाबासाहेबाचे जयजयकार व अभिवादनाने सांगता झाली.
