
धूम स्टाईल चोरी करून पळणारी KTM गँग जेरबंद
सातारा | धूमस्टाईल चोरी करून पळून जाणाऱ्या KTM गँगला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.सातारा पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई करत सापळा रचून या पाचही चोरांच्या मुसक्या आवळल्याची माहिती समोर आली आहे. या चोरट्यांच्या गँगने सातारा जिल्ह्यातील मेढा,मल्हारपेठ,वाई,सातारा तालुका,बोरगाव,खंडाळा,शिरवळ,भुईंज,वाठार,उंब्रज आणि वडुज या भागातील 27 हून अधिक ठिकाणी घरफोडी करत ऐवज पळवला. खुद्द आरोपींनीच त्यांच्या गुन्ह्यांची कबुली दिली.
एवढेच नव्हे तर या चोरट्यांनी सातारा,पुणे,अहमदनगर,कोल्हापूर,सांगली जिल्ह्यातही हैदोस घातला. त्यांच्या चोरीचे क्षेत्र फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नव्हे तर त्यांनी गुजरात आणि कर्नाटकमध्ये जाऊनही अनेक ठिकाणी चोरी केल्याची माहिती देखील समोर आली आहे.पोलिसांनी या आरोपींकडून तब्बल 70 लाख 4 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामध्ये 103 तोळं सोने,5 किलो चांदी आणि चोरीची एक बाईक अशा मालाचा समावेश आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे सामान्य नागरिकांना सुटकेचा निश्वास सोडला.
Live Cricket
Live Share Market



