एक्सप्रेसमध्ये साधूच्या वेषात दहशतवादी, ट्विटने खळबळ; पालघर रेल्वेस्थानकावर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त

एक्सप्रेसमध्ये साधूच्या वेषात दहशतवादी, ट्विटने खळबळ; पालघर रेल्वेस्थानकावर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त पालघर |  :  जयपूर बांद्रा एक्सप्रेस मध्ये 4 संशयित दहशतवादी साधूच्या वेषात असल्याचे ट्विट आल्याने एकच खळबळ उडाली. एका इसमाने रेल्वे हेल्पलाइन वर ट्विट हे केलं होते. ही ट्रेन लवकरच पालघर स्टेशनवर पोहोचणार होती,  हे कळताच पालघर रेल्वे स्टेशनला अक्षरश: छावणीचं स्वरूप आलं. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.मिळालेल्या माहितीनुसार, एका इसमाने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर)  या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रेल्वे हेल्पलाइनला टॅग करत एक फोटो पोस्ट केला होता. जयपूर बांद्रा एक्सप्रेसमध्ये चार संशयित दहशतवादी असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले होते. त्या इसमाने त्या चार साधूंसोबत सेल्फी घेऊन तो फोटो पोस्ट करत वरील माहिती लिहीली होती. मात्र हे ट्विट वाचताच रेल्वे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. या ट्विटची दखल घेत रेल्वे पोलिस सतर्क झाले आणि त्यांनी पालघर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर मोठा बंदोबस्त तैनात केला.
Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close