
विविध विकास कामांचे भुमीपुजन
विकास कामासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणार– सलील देशमुख
विविध विकास कामांचे भुमीपुजन
काटोल, प्रतिनीधी
विकास ही निरंतर चालणारी प्रकिया आहे. त्यासाठी निधीची मोठया प्रमाणात आवश्यकता असते. वेळप्रसंगी निधी मिळण्यासाठी मंत्रालय स्तरावर सुध्दा पाठपुरावा करावा लागतो. विकास कामासाठीचा सातत्यपूर्ण पाठपुरा कमी पडु देणार नाही असे आश्वासन राष्ट्रवादीचे काँग्रेसचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी दिले.
ते काटोल तालुक्यातील विविध विकास कामाचे भुमीपुजन व लोकापर्ण कार्यक्रमात बोलेत होते. सलील देशमुख यांच्या हस्ते पंचधार व आजनगाव येथील विविध विकास कामाचे भुमीपुजन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समीतीचे सभापती संजय डांगोरे, उपसभापती निशीकांत नागमोते चंद्रशेखर चिखले, अरुण उईके, अनुराधा खराडे, धम्मपाल खोब्रागडे, चंदा देव्हारे, गट विकास अधिकारी गरुड साहेब, दिगंबर भोयर, किरण भोयर, पुष्पाकर पवार, निलेश दुबे, वैशाली डांगोरे, पंचधार सरपंच महल्ले, आजणगाव सरपंच अश्विनी नागमोते ग्राम सचिव, ग्राम पंचायत सदस्य तसेच महाविकास आघाडी चे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलतांना सलील देशमुख म्हणाले की, ग्रामिण भागातील जनतेला अनेक अडचणींचा समाना करावा लागतो. त्यांच्या या अडचणी दुर करण्यासाठी आमचे नेहमीच प्रयत्न असतात. एक काम पुर्ण झाले की लगेच दुसरे काम समोर येते. विकास कामे करीत असतांना अनेक अडचणी येतात. स्थानीक पातळीपासुन ते मंत्रालयापर्यत त्याचा पाठपुरावा करावा लागतो. राज्यात सरकार बदल्यानंतर काटोल – नरखेड तालुक्यातील अनेक विकास कामांना स्थगीती देण्यात आली आहे. ती स्थगीती उठविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचीका सुध्दा दाखल करण्यात आली आहे. यामुळे काही कामांवरील स्थगीती उठली असून ईतर कामांवरील स्थगीती उठविण्यासाठीचे प्रयत्न सुरु असल्याचे सलील देशमुख यांनी सांगीतले.



