भाजपच्या विरोधात 15 पक्षांची बैठक

चंद्रपूर : पडोली-घुग्घूस मार्गावर बोलेरोने चार जण प्रवास करत होते. तेवढ्यात बोलेरोचा टायर फुटला. त्यानंतर बोलेरे अनियंत्रित झाली. ही अनियंत्रित गाडी थेट उभ्या असलेल्या ट्रकवर धडकली. यामुळे बोलेरोतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
चंद्रपूर शहरालगत बोलेरोने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. धडकेत 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय. मृतकांमध्ये 2 सख्खे भाऊ आणि त्यांच्या पत्नींचा समावेश आहे.

भाजपच्या विरोधात 15 पक्षांची पत्रकार परिषद,

ममता म्हणाल्या,‘रक्त सांडायला तयार’,

तर मुफ्ती म्हणाल्या, ‘गांधींच्या देशाला गोडसेचा देश बनू देणार नाही

बिहारची राजधानी पाटण्यात आज देशभरातील 15 विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक अतिशय सकारात्मक स्वरुपाची पार पडली आहे. या बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, आदित्य ठाकरे असे दिग्गज नेते या बैठकीसाठी उपस्थित पाटणा : बिहारची राजधानी पाटण्यात आज विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडली. देशभरातील 15 शक्तीशाली विरोधी पक्षांच्या नेत्यांची आज पाटण्यात बैठक पार पडली. ही बैठक सकारात्मक ठरली आहे. सर्व पक्षांनी आगामी काळात एकत्र निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे ही बैठक बोलावल्याबद्दल आभार मानले. या बैठकीनंतर विरोधी पक्षांची एकत्रित पत्रकार परिषद झाली. यावेळी सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली. या बैठकीत एकत्र निवडणूक लढवण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. तसेच पुढच्या बैठकीत हीच चर्चा पुढे नेण्याबाबत चर्चा होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुढची बैठक शिमला येथे जुलै महिन्याच्या 5 ते 10 तारखेच्या दरम्यान होईल, असं सांगितलं आहे.देशासाठी एकत्र आलोय : उद्धव ठाकरे संपूर्ण देशाचे प्रमुख नेते इथे आले आहेत. प्रत्येकजण जाणतात की, आपण वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहोत. मतभिन्नता असू शकते पण देश एक आहे. देशाची एकता आणि अखंडता वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही देशासाठी एकत्र आलोय. देशात जे हुकूमशाही आणू पाहत आहेत त्यांच्याविरोधात आम्ही आहोत. सुरुवात चांगली झालीय. त्यामुळे पुढचा प्रवासही चांगलाच होईल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.सर्वांनी एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय : नितीश कुमार“आज सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली. इथे राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, मेहबुबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला, असे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते”, असं नितीश कुमार यांनी सांगितलं.

 

 

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close