नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक

नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष

नागपूरमध्ये केदारांनी  जिल्हा परिषदेचं मैदान काँग्रेसनं मारलं,    

भाजपचे फोडाफोडी राजकारण पाहता  काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत  . काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करून  विरोधकांना दणका दिला

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता आज झालेल्या निवडणूकीत    महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार सुनील केदार यांनी आपल्या चाणाक्ष अशा व्यूहरचनेने विरोधकांना चारी मुंड्या चित करीत अध्यक्षपदी पाटनसावंगी सर्कलच्या मुक्ता कोक्कड्डे व उपाध्यक्ष पदी गोधणी सर्कलच्या कुंदा राऊत यांनी निवड करण्यात आली -.मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाला अंतर्गत कलहाचा सामना करावा लागला होता. विरोधी पक्षाने सुध्दा आपली व्यूहरचना रचली असताना निवडणूक रिंगणात तरबेज असणारे सुनील केदार यांना मात्र मात देता आली नाही. केदार यांनी पुन्हा एकदा नागपूर जिल्हा परिषदेत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.काँग्रेस पक्षाच्या मुक्ता कोक्कड्डे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ३९ विरुद्ध १८ मतांनी विजय संपादन केला त्याचप्रमाणे उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या कुंदा राऊत यांनी ३८ विरुद्ध १९ मतांनी विजय संपादित केला.

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close