
काटोलमध्ये दिवाळीपूर्वी मिठाई दुकानावर एफडीएचा छापा; भेसळयुक्त पदार्थ व अस्वच्छता उघड
काटोलमध्ये दिवाळीपूर्वी मिठाई दुकानावर एफडीएचा छापा; भेसळयुक्त पदार्थ व अस्वच्छता उघड

काटोल, 17 ऑक्टोबर – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने काटोल शहरातील मिठाई दुकानांवर कारवाई सुरू केली आहे. या अनुषंगाने 16 ऑक्टोबरच्या रात्री 9 ते 12 वाजेदरम्यान धोंराजीवाला प्रवीण मिष्ठान भंडार या प्रतिष्ठानवर महत्त्वपूर्ण छापा टाकण्यात आला.

या कारवाईदरम्यान एफडीए अधिकाऱ्यांना संबंधित गोडाऊनमध्ये केमिकल मिसळलेले अन्नपदार्थ व अत्यंत अस्वच्छ स्थितीतील खाद्यपदार्थ सापडले. यासोबतच गोडाऊनमध्ये अनधिकृतरित्या साठवलेले पदार्थ व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.
छाप्यावेळी काही प्रसारमाध्यमांना घटनास्थळी पोहोचण्यास मज्जाव करण्यात आला. स्थानिक व्यापारी संघटनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने हस्तक्षेप करून प्रकरण ‘समेटात’ आणण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. काही सूत्रांनुसार, अधिकाऱ्यांना लाच घेऊन प्रवीण मिष्ठान भंडार विरोधात कारवाई न कर्ता समेटलं.
ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मिठाई विकली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अजून कडक उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
