
पीक कर्जा करीता आमदार यांची बैठक
शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वितरणासाठी चरणसिंग ठाकूर यांची आढावा बैठक
काटोल प्रतिनिधी : काटोल पंचायत समितीचा सभागृहात शनिवारी काटोल आणि नरखेड तालुक्यातील राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांच्या व्यवस्थापकांची बैठकघेण्यात आली. या वैठकीत ठाकूर यांनी पीक कर्ज वाटपाच्या स्थितीत आढावा घेतला असता आतापर्यंत 7156 शेतकऱ्यांना 113 कोटी 76 लाख रुपयाचे पीक कर्ज वितरित करण्यात आले असून उर्वरित वाटपाचे लक्ष्यतातडीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी बँकांचे अधिकाऱ्यांना देण्यात आले. काटोल आणि नरखेड तालुक्यातील शेतकरी खरीप आणि रंबी हंगामासाठी आवश्यक असलेले खते
बियाणे कीटकनाशके आदीसाठी बँकांकडून पीक कर्जाची मागणी करत आहेत मात्र अनेक राष्ट्रीयकृत बँकांना वेळेवर कर्ज मिळत नसल्याचा तक्रारी शेतकऱ्यांकडून आल्या आहे.यामुळे कृषी हंगामाची तयारी करताना अडचणी निर्माण होत आहे त्यामुळे बँकांनी संवेदनशीलतेने निर्णय घ्यावेत अशी आवाहन ठाकूर यांनी केले आहे. काटोल नरखेड तालुक्यात २०२५ च्या खरीप हंगाम आणि रब्बी हंगामासाठी एकूण 234.68 कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले पार्श्वभूमीवर बँकांनी उर्वरित पात्र शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे अशा सूचना करण्यात आल्या बैठकीला उपविभागीय अधिकारी पियुष चिवंडे, तहसीलदार राजीव रणवीर,गटविकास अधिकारी सूर्यवंशी,सहाय्यक निबंध भरत कासारे उपसभापती गंगाधर झळके, माजी पंचायत समिती सभापती संजय डांगोरे व विविध बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते
