
सेंट्रीग अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू
सेंट्रीग अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू

काटोल : सेंट्रींग चे काम करीत असतांना लिंगा येथील कामगाराचा सेटिंग काढताना दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना काटोल ला दोन दिवसा पुर्वी 11 जून रोजी दुपारी घडली. तुळशीराम लक्ष्मण सोनवणे रा. लिंगा असे मृतकाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की चंद्रकांत घोडे यांच्या घराचे बांधकाम काटोल सुरु आहे. चंद्रकांत घोडे यांनी आपल्या घराचे बांधकाम एका ठेकेदाराला दिले आहे. ठेकेदार मजुराच्या मदतीने घराचे बांधकाम काम करून घेत आहे. नियमित ठरल्याप्रमाणे 11 जून ला ठेकेदाराने लिंगा येथील कामगार तुळशीराम लक्ष्मण सोनवणे याला सेंटिंग च्या कामाला सांगितले होते.तळशीराम सोनवणे हा चंद्रकांत घोडे यांच्या घरी सेंट्रिंग काढत असताना संपूर्ण सेटिंग तुळशीराम चा अंगावर येऊन पडली. सेंटरच्या खाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. यावेळी त्याच्या मदतीला कोणी नसल्याने मृत्यू झाला. परंतु घर मालक चंद्रकांत घोडे यांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला. चंद्रकांत घोडे यांनी बांधकामाची परवानगी घेतली नसल्याचे माजी सरपंच यांनी सांगितले. तसेच घोडे यांनी स्लॅब टाकल्यानंतर 21 दिवसानंतर सेंट्रिंग काढावी लागते. परंतु घर मालक यांनी सेंटिंग काढायच्या वेळी अति घाई केल्याने दहा दिवसात सेंट्रिंग काढायला सुरुवात केली. त्यामुळे त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली, तुळशीराम लक्ष्मण सोनावणे लिंगा तालुका काटोल जिल्हा नागपूर असे मृतकाचे नाव असून आई-वडील आणि पत्नी सह लहान मुलांचा समावेश आहे. या प्रकरणाची काटोल पोलीस तपास करीत असून आरोपी चंद्रकांत घोडे हा सरेंडर झाल्याची माहिती समोर आली आहे,
