
गोसावी समाज,व आदिवासी समाजाला घराचे पट्टे
विदर्भ दर्पण news : 8 मे 2025 ला गुरुवारला मौजा खापरी (केने)ता.नरखेड येथील गोसावी समाज,व आदिवासी समाजाला घराचे पट्टे च्या मागणी करीता नरखेड चे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. नागपुर जि.प.चे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांचे नेतृत्वात व आदिवासी पारधी विकास परिषदचे नागपुर जिल्हा अध्यक्ष देशराज पवार यांचे प्रमुख उपस्थितीत नरखेडचे तहसिलदार श्री उमेश खोडके तसेच गटविकास अधिकारी ,नरखेड डाॅ.निलेश वानखेडे यांची भेट घेऊन गोसावी समाज,व आदिवासी समाजाला घराचे पट्टे ,घरकुल, कर पावती, दाखले मिळावेत तसेच ज्या जागेवर नागरिक राहतात ती वादग्रस्त जागा ग्रा.पं.खापरी (केने)ता.नरखेड च्या हद्दीत की ग्रा.पं.पारडसिंगा यांचे हद्दीत हा वाद निकाली काढावा.
यासंदर्भात नरखेड तहसिलदार यांनी सांगीतले की, उपविभागीय अधिकारी,काटोल तसेच तहसिलदार काटोल व नरखेड यांची संयुक्त बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल व तशी माहीती आपणांस पुरवली जाईल, तसेच गट विकास अधिकारी यांनी सुध्दा सकारात्मक तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले, वंचित लाभार्थांचे घरकुल सर्व्हे करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यासंदर्भात लवकरच उ.वि.अ.काटोल ,तहसीलदार ,गटविकास अधिकारी काटोल,नरखेड यांची संयुक्त बैठक काटोल -नरखेड चे आमदार श्री चरणसीगजी ठाकुर यांचे उपस्थितीत घेऊन प्रकरण निकाली काढण्यात येईल असे आमदार यांनी सांगीतले
