शेतकऱ्यांच्या हितासाठी मातोश्री ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी शेतपादन रस्ता करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या योजनेतून ग्रामीण भागात शेत पांदण रस्त्याचे काम जोरात सुरू आहेत.परंतु काटोल नरखेड तालुक्यातील शेतपानंदन रस्त्याच्या कामात गोलमाल ठेकेदार मालामाल तर शेतकऱ्यांचे बेहाल सुरु आहे..काटोल नरखेड तालुक्यात शेत पांचाळ रस्त्याचे काम जोरात सुरू आहे, दोन्ही तालुक्यात सुरू असलेल्या शेतपांदन रस्त्याचचे काम शुकल्प कन्ट्रक्शन कंपनीने घेतले असून गावरान ठेकेदारांन कडून काम करण्यात येत आहे हे या ठेकेदारांना परिपूर्ण माहिती नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या अधिनियमाखाली काम न करता मनमरजीप्रमाणे काम करीत आहे,नदी नाल्याच्या काठी असलेले शेत पंदन, वन विभागाच्या लगत असलेले पांनंदन ला संमती देऊन ते शेत पांनंदन करण्यात येत आहे. 10 लक्ष रुपयाचा शेतपादन जेसिपी च्या मदतीने करण्यात येते, रस्त्या च्या लगतच नाली करून तेथील मुरूम शेत पंदन वर टाकण्यात येथे, काम करीत असतांना शेतकऱ्यांना विश्वासत घेतल्या जात नाही. नाली करतांना शेताचे नुकसान होणार का या बाबी चा विचार केला जात नाही. शेतकराचे बांध फोडले जातात. थातूर मातुर मुरूम टाकून मोकळे होतात असा सावळा गोंधळ काटोल नरखेड तालुक्यात शेत पान रस्त्याच्या कामात सुरू आहे अशा सावळा गोंधळ असलेल्या शेत पांदन रस्त्याच्या विरोधात गोन्ही चिखली गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदार जिल्हा परिषद, लोकप्रतिनिधी कडे तक्रार केल्या, परंतु तक्रार दाखल न झाल्यामुळे आपल्या व्यथा मांडल्या