
रविवारी घे भरारी मराठी गाण्यांची संगीतमय कार्यक्रम
रविवारी घे भरारी मराठी गाण्यांची संगीतमय कार्यक्रम
नागपूर : स्वर दर्पण म्युझिक अॅकेडमीच्या वतीने घे भरारी या मराठी गाण्याची भाग २ हा नि:शुल्क संगीतमय कार्यक्रम रविवारी सायंकाळी ५वाजता सायंटिफीक सभागृह आठ रस्ता चौक लक्ष्मीनगर येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रपरिषदेत डॉ.मिनाक्षी वाडबुध्दे यांनी दिली. “घे भरारी मराठी गाण्याची भाग २ ” यामध्ये दादा कोंडके यांच्या सुपर डुपर हिट मराठी धमाल गाणी लावणी आणि कॉमेडी असणार आहे. या संगीतमय कार्यक्रमाचे संचालन शेमारु टिव्ही, फेम, हास्य व मिमिक्री कलाकार देवाभाऊ वाघमारे हे करणार आहे. मयुर चौरे, हरीष धापोडकर, प्रशांत भिंगारे, सायली डहाळकर, वैष्णवी साखरकर, निकीता ठाकरे तसेच शहरातील बाल कलाकार राजलक्ष्मी चांदेकर, स्वरा लुटे, देवयानी निंबाळकर, निर्थेश विधाते, भाविक नरुले, आदित्य चौधरी यांचा सहभाग राहणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुप्रसिध्द कलाकार दादा कोंडके यांचे सुपरहिट गाणी ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. संगीत नियोजयन कृणाल दहेकर हे करणार आहे. श्रोत्यांनी नि:शुल्क संगीतमय कार्यक्रमाचा आश्वाद घ्यावा. असे आवाहन आयोजका च्यावतीने करण्यात आले. पत्रपरिषदेला डॉ. मिनाक्षी वाडबुध्दे, डॉ.पल्लवी लुटे, नरेंद्र धरपडे यांची उपस्थिती होती.



