नागपूर विधानसभेवर भव्य कलाकार शाहीरांचा मोर्चा 13 डिसेंबर 2023 ला

नागपूर – भव्य कलाकार शाहीरांचा मोर्चा विविध मागण्यांसाठी हजारो शाहीर कलाकारांच्या उपस्थिती मध्ये विधानसभेवर (दि. 13) डिसेंबर रोजी बुधवार, सकाळी १० वा. धंतोली यशवंत स्टेडियम, दुर्गा मंदीर नागपूर येथून निघून यशवंत स्टेडियम, महाराष्ट्र बैंक, आनंद टॉकीज, लोहापुल मार्गे (बर्डी) टेकडी येथे दाखल होणार. मोर्चाचे नेतृत्व व संयोजक शाहीर राजेंद्र मिमराव बावनकुळे, ज्ञानेश्वर वांढरे, प्रकाश काळे सर,गणेश देशमुख, अरुण मेश्राम, भगवान लांजेवार, नरहरी वासनीक, सौ योगिता नंदनवलर वर्धा करतील कलाकार शाहीरांच्या मोर्चात कोणत्याही पक्षाचा भेदभाव न करता सर्व कलाकार शाहीरांनी एकत्र येऊन विधान सभेवर मोर्चा नेण्याचा निर्धार केला. यांत कलंगी, तुर्रा, सुभान खेमभारती, निळा निशान, लाल निशान, पिवळा निशान खड़ी गम्मत, पोवाडा, तमाशा, खडीदंडार, डाहका, भारुड, भजन, वराडी गीत, तुमडी, गोंधळ, दहा अंकी नाटक, दसनामी, तीन ताल, तेरा ताल, बंजारा, गोंडीगीत, ठुमरी, लोककला, नाटक, लोक नृत्य, लेखक, कवि, शायर, किर्तनकार, आदी कलाकारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती संयोजकांनी केले आहे. या विधानसभेत भारतीय कलाकार शाहीर मंडळ व महाराष्ट्र शाहीर परिषद नागपूर च्या वतीने कलावंत व शाहीर यांचे हितासाठी मागण्या केल्या आहेत यात वृध्द्ध कलावंताच्या मानधन रकमेत वाढ करून आठ हजार ते नऊ, दहा हजार रुपये इतके असावे. अ, ब, क दर्जानुसार असावे त्याची मुदत किमान 3 वर्षाची असावी व नंतर रक्कमेत वाढ व्हावी., जिल्हा समितीमध्ये फक्त वार्षिक 100 मानधन प्रकरणे मंजूरीस असतात, ती प्रकरणे ची संख्या पाचशे मंजुर करावीत. मागिल शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत., वृध्द कलावंत वयोमर्यादा वय 50 वर्ष आहे. ती वय 40 वर्ष करावी कारण आयुष्यभर प्रवास अनियमीतता अशा कारणाने वृध्दत्व लवकर येते., इनकम सर्टीफीकेट (उत्पन्न ) अटेचाळीस हजार रुपये वरुन दोन लाख रुपये करण्यात यावी., वृध्द कलावंतास शासनाकडून सर्व आरोग्य सेवा मोफत मिळण्यात यावी. याबाबत आधार कार्ड प्रमाणे वेगळे शासनमान्य ओळखपत्र शिखर संस्था सभासद कलावंतास द्यावे., वृध्द कलावंत मानधन योजनेतील मानधन रक्कम कलावंताच्या बँक खात्यात जमा व्हावी. त्यात दर महिन्यात अथवा तिमाहीत पणा असावा., लोक कलावंत, शाहीर हे तालुका पातळीवर राहतात, त्यांचे रहाते गावी घर बांधण्यास बँकतर्फे संपुर्ण बिनव्याजी
शासन शिफारसीने कर्ज मिळावे. त्याचे हक्काचे घर होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, बँक हप्ते सोयीस्कर असावेत.,वृध्द कलावंतांच्या मुला मुलीचा शिक्षणाचा खर्च शासनानेच करावा. ते संपुर्ण शिक्षण घेऊ शकतील.,सांस्कृतिक कार्य विभागाप्रमाणेच कलावंत व वृद्ध कलावंत सहाय्य विभाग असा स्वतंत्र शासनाचा विभाग असावा.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close