
मटण खाऊन आले म्हणून भारत हरला, वाद घालत मोठ्या भावाने लहान भावाला संपवलं
नशेत वाद झाला आणि एका क्षणात नको ते घडलं
अमरावती | अमरावती जवळील अंजनगाव बारी गावात ही घटना घडली. अंकित इंगोले (28) असे मृत तरूणाचे नाव असून प्रवीण इंगोले (32) आरोपीचे नाव आहे. रमेश इंगोले असे त्यांच्या वडिलांचे नाव असून ते गंभीर जखमी आहेत.
रविवारी रात्री हे तिघेही घरात वर्ल्डकप बघत बसले होते, तेव्हा ते मद्यपानही करत होते. मात्र भारत हरला आणि मॅच संपली. क्रिकेट मॅच हरल्यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाला. तुम्ही मटण खाऊन आल्याने भारत हरला, असे सांगत नशेत असलेला आरोप प्रवीण याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्याच्या वडिलांनी त्याचा मोबाईल खेचून घेतला आणि तो त्याला मारला. यामुळे आरोपी संतापला आणि रागाच्या भराच त्याने घरातून लोखंडी सळी आणली आणि त्याचा भाऊ अंकित याच्यावर हल्ला केला. तसेच वडिलांनाही मारहाण केली.या हल्ल्या अंकित गंभीर जखमी होऊ खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. तर त्यांचे वडील रमेश हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडिलांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी भांदवि 302, 307 या कलमान्वये आरोपी प्रवीण याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.



